Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा

शोभाताई बच्छावांच्या प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.
Published by :

Mallikarjun Kharge On Narendra Modi : ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक छोटी-मोठी नाहीय. ही महानगरपालिका, जिल्हापरिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान बनवलं आहे, त्याचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. लोकशाहीला टीकवणं आपलं काम आहे. या देशात जर लोकशाही, संविधान नसेल, तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तुमच्या घरी प्रत्येक पक्षाचे लोक येतात, कारण तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे. मतदानामुळे देशात सत्ता बसते. म्हणून ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ज्या संतांनी आणि महान व्यक्तींनी इथे जन्माला येऊन संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तेच काम तुम्हालाही करायचं आहे. तुम्ही हे काम केलं नाही, तर पुढच्या पिढीला तुम्ही गुलामगिरीत ढकल्यासारखं होईल, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते शोभाताई बच्छावांच्या प्रचारसभेत बोलत होते.

मल्लिकार्जून खर्गे जनतेला संबोधीत करताना म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी आदिवासी,दलित, गरीब लोक गुलामीसारखे राहायचे. मोदींना आणि शहांना मतदान केलं तर, तशी परिस्थिती पुन्हा येईल. तुम्हा कुणासाठी मद देत नाहीत. तुम्ही स्वत:साठी मतदान करत आहात. लोकांना पुढे जाण्यासाठी तुम्ही मतदान करत आहात. संविधान वाचलं तरच आपण सुरक्षीत राहू. तेव्हाच आपण राज्य करू आणि गरिबांची सत्ता राहिल. १९६९ ला आमचा पक्ष फुटला होता. तेव्हा इंदिरा गांधींनी नंदूरबारमध्ये पहिली सभा घेतली होती.

तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता आली. असा हा नंदूरबार, धुळे जिल्हा आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकशाही आणि संविधानाला सुरक्षित ठेवायचं आहे. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. मी आमदार, खासदार होतो. एकही निवडणूक मी हरलो नव्हतो. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला. काँग्रेसच्या नावावर मी ५३ वर्षांपासून जिंकत आलो आहे. मी एकाच पक्षात राहिलो. पक्ष बदलून मी कुठेच गेलो नाही. संविधानाला वाचवण्याची संधी आता तुम्हाला आहे. २०२४ ला भाजपला बहुमत मिळालं, तर आम्ही संविधान बदलू, असं भाजप, आरएसएस, मोदींची इच्छा आहे, अशी टीका खर्गेंनी विरोधकांवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com