भावी पत्नी कशी असावी?; राहुल गांधी पहिल्यांदाच म्हणाले...
Admin

भावी पत्नी कशी असावी?; राहुल गांधी पहिल्यांदाच म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटत आहेत. यावेळी राहुल गांधी पक्षाच्या 138व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामील झाले. 'भारत जोडो यात्रा' राजधानी दिल्लीत पोहचली असून, यात्रेने सध्या ब्रेक घेतला आहे. या कार्यक्रमात एका मुलाखती दरम्यान त्यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, माझी आजी इंदिरा गांधी मला प्रचंड प्रिय आहे. इंदिरा गांधी फक्त माझी आजी नसून मला आईसारखीच आहे,आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण असलेली मुलगी भावी पत्नी म्हणून हवी आहे. ज्या मुलीत माझी आई आणि आजीचे गुण असतील अशाच मुलीशी मला विवाह करायचा आहे. तेच चांगलं राहील. असे राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com