काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; म्हणाले...

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; म्हणाले...

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजू वाघमारे म्हणाले की, आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर विजयाची गुढी आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना आपण असे म्हणून सामान्य माणसांचा मुख्यमंत्री. जनतेचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे. ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षामध्ये जी कामगिरी केलेली आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे भारताच्या इतिहासात कमी वेळात जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्याने केलेलं नाही. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. विरोधकांना पण मान्य करावं लागेल. या गोष्टींकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता, कार्यकर्त्यांना विश्वास देणारा, त्यांच्या पाठिवर थाप देऊन त्यांच्या पाठिमागे नव्हे तर त्यांच्या पुढे उभे राहणारा नेता ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं हे जे व्यक्तीमत्व आहे.

तसेच मी नेहमी खरं आहे ते बोलतो. मी बोलताना कोणालाही घाबरत नाही आणि अशाच नेत्याबरोबर मला काम करायला आवडेल. की जो त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वागतोय. मी माझं भाग्य समजतो की, मला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ही संधी दिली. माझ्या संपर्कात काँग्रेस पक्षातील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील हजारो कार्यकर्ते आहेत. मी आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आदर्श मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.असे राजू वाघमारे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com