Sonia Gandhi Heath Updates : सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आपल्या मुलीबरोबर प्रियांका गांधी बरोबर 4 दिवसांपूर्वी शिमला येथे खाजगी दौऱ्यावर असताना अचानक यांची प्रकृती अचानक बिघडली .त्यामुळे त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात त्यांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत.सोनिया गांधी यांचा इसीजी आणि एमआरआयही करण्यात आलाय.सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिंतेचे काहीही कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.
सोनिया गांधी या गेल्या सोमवारी सुट्टीच्या काळात वेळ घालवण्यासाठी शिमला आपल्या फार्महाउसवर गेल्या होत्या. त्या काँग्रेसच्या नेत्या आणि त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांच्या छराबडा येथील खासगी निवासस्थानी थांबल्या होत्या. अचानक त्यांचे ब्लड प्रेशर वाढलेआणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना IGMC रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.सध्या रुग्णालय प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आरोग्यविषयक किरकोळ समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्य सचिव प्रबोध सक्सेना आणि हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्री यांनी रुग्णालयात धाव घेतली . त्यांनी जाऊन सोनिया गांधींच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हेदेखील त्यांच्या दोन दिवसीय उना दौरा रद्द करून ते थेट शिमलाकडे रवाना झाले आहेत. मात्र यामुळे रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सध्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.दरम्यान इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 'सोनिया गांधी यांचे एमआरआय आणि इतर काही आरोग्य चाचण्या केल्या जातील'. 'सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे', अशी माहिती हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी दिली. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.