ताज्या बातम्या
Congress Rally : एसआयआरचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीत काँग्रेसची रॅली, राहुल गांधीही रॅलीमध्ये सहभागी होणार
एसआयआर (SIR) मुद्द्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज दिल्लीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले
एसआयआर (SIR) मुद्द्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज दिल्लीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः सहभागी होणार आहेत.
एसआयआरमुळे लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. देशभरातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार असून, राजधानीत मोठ्या राजकीय शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे.
राहुल गांधी रॅलीत नेमकं काय बोलणार, केंद्र सरकारवर कोणते गंभीर आरोप करणार आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
