"भाजप प्रवेशाबाबत मी कोणताही...", चंद्रकांत पाटील यांच्या ऑफरवर विशाल पाटलांची प्रतिक्रिया
राज्यातील राजकारणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असताना दिसून येत आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजप मध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मात्र यावर आता विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ऑफरबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले की, "माझ्या कामाची पद्धत पाहून चंद्रकांत दादांनी मला ऑफर दिली आहे. ही माझ्या कामाची पोचपावती आहे. पण भाजपप्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी माझा उर्वरित कार्यकाळ अपक्ष म्हणूनच पूर्ण करेन. मी अपक्ष असल्याने मी कायदेशीरित्या कोणत्या पक्षात प्रवेश करू शकत नाही. कोणत्याही विषयाला इश्यूबेस्ट पाठिंबा देण्याची माझी तयारी आहे", असेही विशाल पाटील म्हणाले.
कॉंग्रेसचे विशाल पाटील या मतदार संघात लढायची तयारी करीत दोन वर्षांपासून करत होते. भाजपाच्या संजय काका पाटील यांचा पराभव करून ठाकरे गटाला धक्का देत विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली होती.