ताज्या बातम्या
Jayant Patil: काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा, जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई महापालिका स्वबळावर लढणं काँग्रेसचा निर्णय,पण आमचे नेते संपर्क साधून,योग्य तो निर्णय घेतील - जयंत पाटील.
मुंबई महापालिका स्वबळावर लढणं काँग्रेसचा निर्णय,पण आमचे नेते संपर्क साधून,योग्य तो निर्णय घेतील - जयंत पाटील.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणे हा काँग्रेसचा निर्णय आहे,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची चर्चा अजून झालेली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी,मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिली आहे.तसेच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आमचे मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते यावर चर्चा करतील, काँग्रेसशी देखील संपर्क साधतील आणि योग्य तो निर्णय घेतील,असं देखील आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगलीच्या उरुण ईश्वरपूर मध्ये बोलत होते.
