BJP MP Anil Bonde :
BJP MP Anil Bonde :BJP MP Anil Bonde :

BJP MP Anil Bonde : 'या' धमकीनंतर अमरावतीत तापलेलं वातावरण; नेमकं प्रकरण काय?

अमरावतीत Islamic Information Centre च्या फलकावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकीपर्यंत पोहोचला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अमरावतीत Islamic Information Centre च्या फलकावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकीपर्यंत पोहोचला आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या फलकाचा विरोध करत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना हैदराबादमधून ई-मेलद्वारे इशारा देण्यात आला असून, यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य चौकात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचा फलक लावण्यात आला होता. या फलकावर आक्षेप घेत खासदार बोंडे यांनी पोलिसांकडे परवानगी प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त करत एक ई-मेल सोमवारी रात्री त्यांच्या अधिकृत मेलवर आला.

“अस्सलामुअलेकुम डॉ. साहेब” अशी सुरुवात असलेल्या ई-मेलमध्ये, बोंडे यांच्या शब्दांनी हैदराबादमधील मुस्लिम समाजात “तंग आणि तापलेले वातावरण” निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. “आपण आमच्या धार्मिक गैरतला धक्का दिला आहे. एकही चुकीचा शब्द वातावरण पेटवू शकतो. आपल्या विधानांवर संयम ठेवा” असा इशारा मेलमध्ये देण्यात आला आहे.

या ई-मेलची तक्रार अनिल बोंडे यांच्या कार्यालयाकडून राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे. पोलीस या मेलचा स्त्रोत, संबंधित व्यक्ती आणि त्यामागील उद्देश तपासत आहेत. धार्मिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.

थोडक्यात

  • अमरावतीत Islamic Information Centre च्या फलकावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकीपर्यंत पोहोचला आहे.

  • भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या फलकाचा विरोध करत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना हैदराबादमधून ई-मेलद्वारे इशारा देण्यात आला.

  • हैदराबादमधून ई-मेलद्वारे इशारा देण्यात आला असून, यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com