अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून वाद

अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून वाद

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात आलेले चप्पल स्टँड हटवण्यावरुन वाद निर्माण झालाय.

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात आलेले चप्पल स्टँड हटवण्यावरुन वाद निर्माण झालाय. चप्पल स्टँड बेकायदा असल्याचं सांगत मंदिर प्रशासनानं स्टँड हटवण्यास सुरुवात केली. याला स्थानिकांनी विरोध केलाय. यावरुन मंदिर प्रशासन आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झालाय.

महानगरपालिकेने जेसीबी आणून अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून असलेली सर्वच दुकाने हटवली. यावेळी दुकानदारांनी कारवाई करण्यास विरोध केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चप्पल स्टँड सुविधा करण्यात आल्यानंतर मंदिराच्या भिंतीलाच खेटून असलेल्या दुकानांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

हे चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचं म्हणत प्रशासनाकडून या चप्पल स्टँड चालकांना नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीसवर दिलेल्या वेळेच्या आधी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप चप्पल स्टँड चालक करत आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने आज कारवाईला सुरुवात केली. महिलांनी याला जोरदार विरोध केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com