ताज्या बातम्या
NCP SP Vs BJP: राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेल्या नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी, संदीप नाईक यांना पक्षात घेणार भाजप?
नवी मुंबईतील राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी, चंद्रशेखर बावनकुळे व गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
नवी मुंबईतील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. तुतारी हातात घेणारे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात आले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. दरम्यान, संदीप नाईक यांना पक्षात घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली आहे.