Pune Bus : पुण्यातील बस प्रवासाचा खर्च वाढला, तिकिट आणि मासिक पासच्या दरात वाढ
पुणेकरांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे . पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) कडून शहर आणि परिसरातील बस प्रवासाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर पीएमपीएमएलने बसभाड्यात ही मोठी वाढ केली असुन नवीन दरानुसार १ ते ५ किमी अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत. दरवाढीबरोबरच दैनंदिन आणि मासिक पासचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. यामध्ये मात्र विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवीन सुधारित दरानुसार प्रवासाचे अंतर आणि त्यावर आधारित दर
३१ मे रोजी पीएमपी च्या मुख्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली त्यामध्ये बस दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानुसार या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली. यापूर्वी २०१४-२०१५ मध्ये पुणे प्रशासनाने ही भाडेवाढ केली होती. नवीन रचनेनुसार ही भाडेवाढ एकूण ११ ट्प्य्यांमध्ये करण्यात आली आहे. आता तब्बल १० वर्षानंतर नवीन दरानुसार प्रवाशांना नवे दर १ जुन पासुन लागु करण्यात आले आहेत.
१ किमी – ५ किमी :- १० रुपये
५.१ किमी – १० किमी: - 20 रुपये
१०.१ किमी – १५ किमी: - 30 रुपये
१५.१ किमी – २० किमी: - 40 रुपये
दैनंदिन पास (पुणे व पिंपरी-चिंचवड): 70 रुपये (पूर्वी ४० रुपये होता)
दैनंदिन पास (PMRDA हद्दीत): 150 रुपये ( पूर्वी १२० रुपये होता )
मासिक पास: 1500 रुपये (पूर्वी ९०० रुपये होता )
या दरवाढीचा परिणाम पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील लाखो प्रवाशांवर होणार आहे. या दरवाढीचा उद्देश इंधन दरवाढ, मेंटेनन्स खर्च, कर्मचारी वेतन आदी खर्च लक्षात घेऊन घेतलेला निर्णय असल्याचे पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे.त्यामुळे आता पुण्यातील बेस्ट प्रवाशांना आता प्रवासी तिकिटांचे दर वाढल्यामुळे खिश्याला कात्री बसणार हे नक्की आहे. भाडेवाढ केल्यानंतर प्रशासनाने ई तिकीट प्रणाली कॉमन मोबलिटी कार्ड ऑनलाईन ऍप मध्ये ही बदल करण्यात आल्याचे यावेळी पीएमपीच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुधोळ यांनी सांगितले.