पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीस सुरुवात; मुंडे बहिण - भाऊ, क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला
Admin

पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीस सुरुवात; मुंडे बहिण - भाऊ, क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीस सकाळी सुरुवात झाली आहे.

विकास माने, बीड

बीड जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीस सकाळी सुरुवात झाली आहे. साधारण साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील बीड आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतणे तर परळीत मुंडे बहीण भावामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय.

काल वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान आता परळी बाजार समितीवर पंकजा मुंडे विजय मिळवतात का हे पाहणं महत्वाचं असेल. तर जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पाच पक्षांना एकत्र घेत काका विरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण आपल्या वर्चस्व कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com