Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटलांना न्यायालयाचा दणका

मंत्री गुलाबराव पाटलांना दणका; न्यायालयाने ठोठावला 'एवढा' दंड
Published by :
shweta walge

गुलाबराव पाटलांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं हा दंड ठोठावला आहे. एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात पहिल्याच सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे. गुलाबराव पाटलांनी वकिला मार्फत न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. 21 जून रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याची तंबी देखील न्यायालयाने गुलाबराव पाटलांना दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com