Kedar Jadhav : क्रिकेट सोडून केदार जाधव उतरणार राजकारणाच्या मैदानात, आज पक्षप्रवेश होणार
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव हाती कमळ घेणार असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
नुकतीच केदार जाधवने रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी तीन वाजता भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. 2014 साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
केदार जाधवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 73 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. टी-20 सामन्यांमध्ये जाधवने फक्त नऊ टी-20 सामने खेळले असून त्यात 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. 2020 साली केदार जाधवने शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली.