'गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून' मोदी सरकारच्या कामावर सामनाच्या अग्रलेखातून टीका

'गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून' मोदी सरकारच्या कामावर सामनाच्या अग्रलेखातून टीका

देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच मोदी सरकारच्या कामावर टीका करत 'स्वातंत्र्य यांवर घाला घालून देशात नवी गुलामगिरी जन्माला
Published by  :
shweta walge

देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच मोदी सरकारच्या कामावर टीका करत 'स्वातंत्र्य यांवर घाला घालून देशात नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून सुरू' असल्याच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देशाच्या या स्वातंत्र्यावर भाष्य करण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख

एकीकडे ब्रिटिश कायद्यांचे जोखड फेकून नवे ‘सार्वभौम’ कायदे आणल्याचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे स्वतंत्र हिंदुस्थानच्या कायद्यांचा, नागरी स्वातंत्र्याचा संकोच करायचा. देशातील हे चित्र चिंताजनक आहे. हिंदुस्थान हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहेच , परंतु हिंदुस्थानी घटनेने आणि लोकशाहीने जनतेला दिलेले अधिकार , धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक , आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य यांवर घाला घालून देशात नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून सुरू आहेत . स्वातंत्र्यातील हे ‘ पारतंत्र्य ‘ उलथवून टाकण्याची शपथ जनतेनेच आजच्या स्वातंत्र्य दिनाला साक्षी ठेवून घ्यायला हवी!

देशाचा स्वातंत्र्य दिन आज देशभरात नेहमीच्या उत्साहात साजरा होईल. तो उत्साहातच साजरा व्हायला हवा. कारण हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या बलिदानातून, त्यागातून हा देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ गेल्या वर्षी देश-परदेशांत उत्साहातच साजरा झाला होता. अर्थात केंद्र सरकारच्या पातळीवर हा उत्साह असा होता की, जणू विद्यमान सत्तापक्षानेच देशाचा स्वातंत्र्य लढा एकहाती जिंकला आणि नंतरच्या 75 वर्षांत त्यांच्यामुळेच देश प्रगतीची आजची उंची गाठू शकला.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तही वेगवेगळे अभियान राबविले गेले. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘माझी माती-माझा देश’ हे उपक्रम घोषित झाले. ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या घोषवाक्यासह ‘माझी माती-माझा देश’ हा उपक्रम 9 ऑगस्टपासून देशभरात राबविला गेला. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पंचप्रण शपथ’ घ्यायची आणि मातीचा दिवा हातात घेऊन काढलेला ‘सेल्फी’ संबंधित संकेतस्थळावर अपलोड करायचा असे त्याचे स्वरूप होते. या अभियानांमागे देशभक्तीची भावना जागृत व्हावी हा उद्देश आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. ते खरे असेलही आणि हे उपक्रम चांगलेच आहेत, परंतु त्या सोबतच राज्यकर्त्यांचा कारभारही तेवढाच खरा आणि शुद्ध आहे का? हे सरकार सत्तेत आले तेव्हापासूनच, म्हणजे 2014 पासूनच या सरकारचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा आहे. वेगवेगळे ‘मुखवटे’ चढवून स्वतःला देशभक्त भासवायचे आणि त्या मुखवटय़ांआड लपून आपली हुकूमशाही राबवायची.

एकीकडे स्वातंत्र्याचा घोष करायचा आणि दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याची गळचेपी करायची. स्वातंत्र्य, लोकशाही फक्त तोंडी लावायला, बाकी कारभार दडपशाही आणि निरंकुश दबाव तंत्राचा. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा जेवढा अनिर्बंध वापर देशात मागील नऊ वर्षांत झाला, तेवढा कधीही झालेला नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय गुलामगिरी लादली जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीत सर्वच धर्म, जात, पंथांचे भरीव योगदान होते. मात्र त्या योगदानावरही मोदी सरकारच्या ‘सांस्कृतिक टोळधाडी’ अतिक्रमण करीत आहेत

'गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून' मोदी सरकारच्या कामावर सामनाच्या अग्रलेखातून टीका
Eknath Shinde: 'गरीबी हटाव' घोषणा झाल्या, पण मोदींनींच गरीबी हटवण्याचा प्रयत्न केला'

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com