Nashik Cybercrime Special Report : तोतया अधिकाऱ्यांकडून अनेकांना लाखोंचा गंडा; आता स्पेशल रिपोर्ट वाचा एका क्लिकवर
हल्ली सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. तुमचं लाईट बिल थकलंय, तुमचं बँक अकाऊंट बंद होणार आहे, अशी कारणं सांगून लोकांना फसवलं जात आहे. त्यातच आता या सायबर चोरांचा नवा फंडा समोर आला आहे. कारण आता या सायबर चोरट्यांनी टार्गेट केलंय हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेलमध्ये मुक्काम करणारे ग्राहक आहेत.
मोबाईल वापरताना तुम्हाला अचानक एखाद्याचा व्हिडीओ कॉल येतो. तो तुम्ही रिसिव्ह करता आणि त्यानंतर तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा आहे असं सांगितलं जातं. आम्ही ईडीचे किंवा आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून धमकावले तर घाबरू नका. तात्काळ सायबर पोलिसांची मदत घ्या. कारण आता सायबर हॅकरकडून नवीन फंडा वापरून उच्चशिक्षितांपाठोपाठ व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना गंडा घातला जातोय. नाशिकमध्ये अनेकांना आतापर्यंत अटकेची भीती दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ यांनी लोकशाही मराठी संवाद साधला. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, "ड्रग्ज, अमली पदार्थ बाळगलेल्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याचे सांगून लाखो रुपये उकळल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. व्यावसायिकांना विश्वास दाखवून फसवण्याचा हा नवीन फंडा सायबर हॅकर कडून अवलंबला जात आहे यामुळे नाशिक मध्ये गेल्या सहा महिन्यात हॉटेल व्यावसायिक यांच्यासह अन्य नागरिकांकडून 17 कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे."
सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी लोकशाही मराठी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाल्या की, "सायबर पोलिस सायबर हॅकर कडून आता व्यावसायिकांना आणि सामान्य नागरिकांना टार्गेट केले जात आहे. मात्र असे कुठले भीती दाखविणारे कॉल आल्यास घाबरून न जाता सायबर पोलिसांची मदत घ्यावी. डिजिटल अरेस्ट असला कुठलाही प्रकार अस्तित्वात नसून हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहता कुठल्याही अशा भीतीला बळी पडू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे."
सायबर गुन्हा घडल्यास cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी, अशी देखील जनजागृती करण्यात आली आहे. तसेच डिजिटल अरेस्टमध्ये भीती दाखवल्यास त्यातून कसे बाहेर पडावे याची देखील माहिती सायबर तज्ञांकडून देण्यात आली आहे.