Cyclone Alert : अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
थोडक्यात
अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्रीवादळाचा धोका
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
(Cyclone Alert) राज्यात पावासाने विश्रांती घेतली असतानाच आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला असून अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून हे चक्रीवादळ अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकण्याची शक्यता आहे.