हाहा:कार… गुजरातमध्ये बिपरजॉयचा प्रचंड तडाखा

हाहा:कार… गुजरातमध्ये बिपरजॉयचा प्रचंड तडाखा

Cyclone Biparjoy : गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

Cyclone Biparjoy : गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत होते. बिपरजॉयमुळे गुजरातला हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच आता अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला पोहचले आणि हाहा:कार झाला.

अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब कोसळले आहेत. या वादळामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे. या वादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 74 हजार लोकांना लोकांची व्यवस्था करण्यात आली. अनेक ठिकाणी बत्तीगुल झाली आहे. हवामान खात्याने ताशी 140 ते 150 किलोमीटर वारे वाहतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यापेक्षा कमी वेगाने वारे वाहत आहेत. या दरम्यान वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगितलं जात आहे.. बिपरजॉयमुळे 99 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com