ताज्या बातम्या
Mankhurd : मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट
मुंबईत मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईत मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जखमी महिलेला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्शिशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सोमवारी रात्री ही घटना घडली असून शहाबाज खान हे मानखुर्दच्या हनुमान मंदिराजवळ कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात.
घरात अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर घराला आग लागली. घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर यामध्ये शरीफा खान या मुलीचा मृत्यू झाला. तर तिची आई फरान खान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.