Goa Cylinder Blast
Goa Cylinder Blast

Goa Cylinder Blast : दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; 2 जणांचा मृत्यू ,5 जखमी

स्फोटात दोन जणांचा मृत्यू, पाचजण जखमी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट

  • स्फोटात दोन जणांचा मृत्यू, पाचजण जखमी

  • मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता

(Goa Cylinder Blast) दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून यामध्ये 2 जणांचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. लोटलीम येथील विजय मरीन परिसरात हा सिलेंडरचा स्फोट झाला.

या स्फोटात दोन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मडगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com