Navi Mumbai
ताज्या बातम्या
Navi Mumbai : कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट; आई-मुलीचा मृत्यू
कामोठे सेक्टर 36मधील धक्कादायक घटना
थोडक्यात
पनवेलच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट
स्फोटात आई-मुलीचा मृत्यू
कामोठे सेक्टर 36मधील धक्कादायक घटना
( Navi Mumbai) पनवेलच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आई-मुलीचा मृत्यू झाला असून कामोठे सेक्टर 36मध्ये ही घटना घडली.
सोसायटीमध्ये सोमवारी रात्री अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
आग लागली असताना घरात पाच जण होते यामधून तिघांना बाहेर काढण्यात आले मात्र आई आणि मुलगी घरातच अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.