Shrikant Shinde & Dada Bhuse in Kalyan
Shrikant Shinde & Dada Bhuse in KalyanTeam Lokshahi

शिंदे गट कल्याण डोंबिवलीमध्ये मेळाव्याद्वारे करणार शक्तीप्रदर्शन

उद्या मंत्री दादा भुसे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित होणार शक्तीप्रदर्शन

अमजद खआन | कल्याण: राज्यात शिंदे आणि ठाकरे गटात राजकीय चढाओढ सुरु असताना एकीकडे ठाकरे गट ठिकठिकाणी मेळावे घेत आहे. दुसरीकडे शिंदे गटाने ही कंबर कसली आहे. उद्या शुक्रवारी शिंदे गटाकडून हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विशेष मार्गदर्शक म्हणून मंत्री दादा भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहे. डोंबिवलीतील पाटीदार भवनात हा मेळावा होणार आहे.

Shrikant Shinde & Dada Bhuse in Kalyan
Wine in General Stores: शंभुराज देसाईंना हवी मॉलमध्ये वाईनविक्री; मुद्दा पुन्हा चर्चेत

सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात राजकीय चढाओढ सुरु आहे. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणी संवाद साधत आहे. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या समर्थन देणा:या आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभांचा धडाका लावला आहे. दोन्ही गटाकडून वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये ठाकरे गटाने मेळावा घेतला होता. या मेळाव्यात कार्यकत्र्याची एकच गर्दी झाली होती. मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला होता. आत्ता कल्याण डोंबिवली प्रथमच शिंदे गटाच्यावतीने मेळावा उद्या होणार आहे.

या मेळाव्यात राज्याचे बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे आणि खासदार शिंदे उपस्थित राहणार आहे. या संदर्भात आज दुपारी पदाधिकारी राजेश कदम , राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटातील नगरसेवक पदाधिकारी यांची बैठक पार पडली. उद्या मेळाव्यात शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याणमध्ये देखील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थीत शिंदे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिका:यांची बैठक आज सायंकाली होणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com