Dagdu Sapkal Join Shivsena Shinde Group
Dagdu Sapkal Join Shivsena Shinde GroupDagdu Sapkal Join Shivsena Shinde Group

Dagdu Sapkal Join Shivsena Shinde Group: महापालिका निवडणुकांच्या तोडांवर ठाकरे गटाला मोठा धक्का, दगडू सकपाळ यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Dagdu Sapkal Join Shivsena Shinde : शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.\
Published by :
Riddhi Vanne
Published on

शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. हा निर्णय घेताना मनावर दगड ठेवावा लागला, असे सकपाळ यांनी स्पष्ट केले.

मुलीला निवडणुकीची संधी न मिळाल्याने आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याची भावना असल्यामुळे आपण नाराज झालो होतो, असे त्यांनी सांगितले. शिवडी मतदारसंघातील प्रभागासाठी मुलगी इच्छुक होती, मात्र तिला उमेदवारी मिळाली नाही.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सकपाळांचे स्वागत करताना, हा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. दगडू सकपाळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे कार्यकर्ते असून त्यांनी लालबाग-परळ परिसरात पक्ष मजबूत केला, असे शिंदे म्हणाले. काही लोक जुने, कष्टकरी कार्यकर्ते विसरतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

दगडू सकपाळ यांनीही पक्षाकडून आपली दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली. वय झाल्यामुळे आपली गरज संपली, अशी भावना झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अखेर शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी राजकीय प्रवासाला नवी दिशा दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com