Dahi Handi 2025 : गोविंदा आला रे आला... दहीहंडीच्या शुभप्रसंगी, प्रेमळ संदेशांनी साजरी करा आपुलकीची हंडी; WhatsApp, Facebook ला ठेवा हे स्टेटस
कृष्णजन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या दिवशी दहीहंडी सण साजरा केला जातो. दहीहंडीलाच गोपाळकाला असे देखील म्हटलं जाते. "गोविंदा आला रे आला" या जयघोषानेसंपुर्ण महाराष्ट्र दुमदुमून उठतो. यंदा कृष्णजन्मोत्सव 15 ऑगस्ट म्हणजेच स्वतंत्र्यदिनी साजरा केला जाणार असून दहीहंडी ही 16 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. दरम्यान दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे काही मेसेजेस, फोटो, पोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे इमेजेस, मेसेजेस व्हॉट्सअपवर शेअर करुन किंवा स्टेट्स तुम्ही ठेवून मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना दहीहंडीच्या शुभेच्छा देऊ शकता.
तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण,
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज,
मटकी फोडू, खाऊ लोणी,
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांचा हार, पावसाची सर,
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर,
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!