ढाकुम्माकुम! दहीहंडीची धूम, यंदा नऊ थरांचा विक्रम मोडणार?

ढाकुम्माकुम! दहीहंडीची धूम, यंदा नऊ थरांचा विक्रम मोडणार?

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होणार आहे. उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहे, तर दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी केली आहे. जास्तीत जास्त थर लावणाऱ्या पथकाला लाखोंची बक्षिसे मिळणार आहे. तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक थर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे. कारण तशा प्रकारची भरघोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे.

मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. जय जवानच नाही तर मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सुद्धा अशाच प्रकारे सराव करत आपला उत्साह वाढवताय. दोन महिन्यापासून मुंबईतलं नावाजलेला 'जय जवान' गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहे.

दहीहंड्यांचं विशेष आकर्षण

2)ठाणे -मनसे दहीहंडी उत्सव - आयोजक - मनसे नेते अविनाश जाधव

बक्षीस - 10 थरांसाठी - 21 लाख

9 थरांसाठी - 11 लाख

1)ठाणे - संस्कृती युवा प्रतिष्ठान

आयोजक - आमदार प्रताप सरनाईक

बक्षीस- 10 थरांसाठी - 21 लाख

9 थरांसाठी - 11 लाख

8 थरांसाठी - 50 हजार

3)ठाणे - भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव- आयोजक- शिवाजी पाटील

बक्षीस- 9 थरांसाठी - 11 लाख

8 थरांसाठी - 25हजार

7 थरांसाठी- 10 हजार

ठाणे - शिवसेना टेंभी नाका मानाची हंडी - मार्गदर्शक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बक्षीस- सर्वाधिक थर लावल्यास मुंबई ठाणे गोविंदा पथकाला प्रत्येकी दोन लाख 51 हजार रुपये

महिला गोविंदा पदकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस

मुंबई - वरळी जांभोरी मैदान भाजप भव्य दहीहंडी उत्सव मार्गदर्शक - आमदार आशिष शेलार

ठाणे - आनंद चॅरिटेबल ट्रस्ट महा दहीहंडी उत्सव -आयोजक-खासदार राजन विचारे

मुंबई - बोरिवलीत मागाठाणे देवीपाडा दहीहंडी उत्सव आयोजक - आमदार प्रकाश सुर्वे

Lokshahi
www.lokshahi.com