ताज्या बातम्या
दहिसरमधील झोपडपट्टीवासीयांना वन विभागाची नोटीस, गोपाळ शेट्टी मदतीला
दहिसर येथील केतकीपाड्यातील 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या झोपडपट्टीमधील नागरिकांना वन विभागाने नोटिस पाठवल्या आहेत.
दहिसर येथील केतकी पाड्यातील नागरिकांना वन विभागाने नोटिस बजावल्या आहेत. दहिसर येथील केतकीपाड्यातील 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या झोपडपट्टीमधील नागरिकांना वन विभागाने नोटिस पाठवल्या आहेत. यामुळे केतकीपाडा येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे.
वन विभागाने बजावलेल्या नोटिस संदर्भात आता माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केतकी पाड्यामध्ये येऊन नागरिकांची भेट घेतली. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. या सगळ्यांमुळे आता हजारो नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. गोपाळ शेट्टी यांनी तेथील नागरिकांबद्दल काळजी व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल वन विभागाला प्रश्न विचारणार असल्याचेही ते म्हणाले.