Anjali Damania : पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा...दमानियांची मागणी
थोडक्यात
पार्थ पवार जमीन व्यवहाराची पार्थ पवारांना होती.. अंजली दमानियांचा दावा.
पार्थ पवारची अमेडिया कंपनीत 90 टक्के पार्टनरशीप'
पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा... दमानियांची मागणी
पार्थ पवार यांच्या पुणे कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक खुलासा केला आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी केली असा आरोप झाला. हा जमीन व्यवहार वादात सापडल्यानंतर तो रद्द करण्याची वेळ आली. तसं जाहीर करण्यात आलं. पण हा जमीन व्यवहार पार्थ पवार रद्दच करु शकत नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले की, एक समिती या जमीन व्यवहार प्रकरणात स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चाैकशी करू शकेल का? निपक्ष चाैकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा.
गायकवाड कुटुंबियांच्या नावाने ही जमीन नाही, मग ते व्यवहार कसा करू शकतात. शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. आम्ही तो व्यवहार रद्द करतो, म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्यासारखे आहे.
पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. अजित पवारांनी सांगितले त्याप्रमाणेच झाल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांचाच राजीनामा मागितला आहे. अमेडिया कंपनीबद्दल आपण अजून काही मोठे खुलासे करणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढताना आता स्पष्ट दिसत आहे.
