Bharat Gogawale On Ambadasa Danave : "दानवेंना सरकारविरोधात बोलावं लागणार नाहीतर..." गोगावलेंच अजबच विधान; असं म्हण्यामागे काय कारण?

Bharat Gogawale On Ambadasa Danave : "दानवेंना सरकारविरोधात बोलावं लागणार नाहीतर..." गोगावलेंच अजबच विधान; असं म्हण्यामागे काय कारण?

योजना बंद करण्यावरून दानवेंनी सरकारवर टीका केली होती. यावर आता महायतीतून शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच निर्णयावर फुल्या मारल्या. बंद पडलेल्या योजनांची नावे एक्स पोस्टद्वारे जाहीर केलीत. तसेच निवडणुकांच्या वेळी या सगळ्या खोट्या योजनांचे पितळ जनतेसमोर उघडे करणार असल्याचे नमूद केलं होत.

योजना बंद करण्यावरून दानवेंनी सरकारवर टीका केली होती. यावर आता महायतीतून शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे त्यांना सरकारच्या विरोधात काही ना काही बोलावच लागेल. ते त्यांच कर्मप्राप्त आहे. त्याशिवाय त्यांचं पद टिकून राहणार नाही. त्यांना अगोदरपासून जी सवय लागली होती ती आता तशीच चालू राहिल. कारण पुढे येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून काही अपेक्षा असू शकते". असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

पुढे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील योजना आताच्या सरकारने बंद केल्यावरून दानवे यांनी सरकारवर टीका केली. त्यावर ते बोलताना म्हणाले की, "महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना या मोठ्या योजना सुरूच आहेत. ते आता केवळ आनंदाचा शिधा घेऊन बसले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे". त्यांना सरकार सावरत आहे याकडे मंत्री भरत गोगावले यांनी लक्ष वेधले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com