Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यताWeather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई पाऊस: काळ्या ढगांची गर्दी, पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने जोर लावला आहे

पुढील 3 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे मुंबईकरांन उकाड्यापासून आराम मिळणार.

सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये काळ्या ढग पाहायला मिळत आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबईत पावसाने जोरदार बॅंटीग सुरु आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे गरज असेल तर, बाहेर पडा असा सल्ला हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळे उकड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना काहीसा आराम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या बेलापूर स्थानकावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा...

घरातच रहा, खिडक्या आणि दरवाजे बंद करा, आणि शक्य असल्यास प्रवास टाळा.

सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, आणि झाडे किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर रहा.

विजेच्या तारांना स्पर्श करण्यापासून दूर राहा, आणि विजेच्या खांबाजवळ उभे राहणे टाळा.

पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.

वीज वाहक वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com