"महिलांना लखपती...", अर्थसंकल्पानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल भाष्य केले. तसेच कृषी क्षेत्रावर अधिक लक्ष दिले असल्याचेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजने'वरही भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विरोधी पक्षाला बोलण्यासाठी आम्ही काहीही जागा ठेवली नाही. 5 वर्षांचा वचननामा केला आहे. आम्हाला महिलांना लखपती करायचं आहे. शेतकऱ्यांसाठीही सन्मान योजना करतोय. कुठलाही विभाग बाकी ठेवलेला नाही. दिव्यांगांसाठी प्रयत्न करतोय, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.