ताज्या बातम्या
Kapil Sharma : कपिल शर्मासह अनेक कलाकारांना जीवे मारण्याची धमकी
कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कपिल शर्मासोबतच अभिनेता राजपाल यादव, कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पाकिस्तानमधून ई-मेलद्वारे ही धमकी आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणाऱ्याने कपील शर्माला त्याच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
या प्रकरणी आता आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.