कर्ज पुन्हा महागलं; रेपो रेटमध्ये 50 बेसिसची वाढ

कर्ज पुन्हा महागलं; रेपो रेटमध्ये 50 बेसिसची वाढ

आज आरबीआयचं पतधोरण जाहीर करण्यात आले आहे . आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर केले.
Published by :
Team Lokshahi

आज आरबीआयचं पतधोरण जाहीर करण्यात आले आहे . आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक 3 ऑगस्ट पासून सुरू झाली होती. रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC meeting) बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती दिली.

याच पार्श्वभूमीवर कर्ज पुन्हा महागलं असून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. अर्धा टक्क्यानं वाढ झाल्याने रेपो रेट 5.40 टक्क्यांवर गेली आहे. वर्षभरात तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जाचा हफ्ता आता वाढणार आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

याच्याअगोदरसुद्धा आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com