रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; चुकूनही विसरू नका ‘या’ गोष्टी
भाऊ-बहिणीचे नाते अतूट असते आणि त्यात गोडवा म्हणून काम करते, दरवर्षी येणारा रक्षाबंधनाचा सण. हा सण हे नाते अधिक घट्ट करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि ओवाळते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रक्षाबंधनाच्या थाळीची सजावट कशी करावी हे जाणून घेणार आहोत.
ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी असाव्यात
कुंकू
ओवाळणीत भावाच्या कपाळावर टिळा लावला जातो. यासाठी ओवाळणीच्या ताटात कुंकू असावं.
राखी
रक्षाबंधनासाठी तयार करायच्या थाळीत राखी असायलाच हवी.
निरंजन
रक्षाबंधनाच्या थाळीत निरंजन व फुलवात असावी. साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल.
तांदूळ
टिळा लावल्यावर त्यावर तांदूळ लावण्याची सुद्धा पद्धत आहे. असं म्हणतात ज्या बहिणीचे जितके तांदूळ भावाच्या कपाळावर राहतात तितकं अधिक त्या नात्यात प्रेम असतं.
मिठाई
थाळीत मिठाई ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही बनवलेली एखादी गोडाची रेसिपी सुद्धा तुम्ही भावाला खाऊ घालू शकता.