Deepak Kesarkar : देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबर राहिलेला आहे, त्यामुळे तो तसाच राहणार आहे

Deepak Kesarkar : देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबर राहिलेला आहे, त्यामुळे तो तसाच राहणार आहे

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
Published by :
Siddhi Naringrekar

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबर राहिलेला आहे. त्यामुळे तो तसाच राहणार आहे. भारत एक बलवान देश बनणार आहे. त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदीजींच्या मागे उभी आहे. याची मला खात्री आहे. मतदानाचा हक्क सर्वानीच बजावला पाहिजे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कोकण आता वेगळ्या दिशेनं जात आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. असंख्य तरुण मुलं आपल्याकडे आशेनं बघता आहेत. 1 लाखापेक्षा अधिक मतांनी आदरणीय राणे साहेब विजयी होतील. याची मला खात्री आहे. असे केसरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com