Deepika Padukone On SN Subrahmanyan: L&T कंपनीच्या चेअरमनच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिका संतापली, म्हणाली एवढा मोठा माणूस असं बोलतोय...
अभिनेत्री दीपिका पादुकोण कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येताना दिसते ती अनेकदा ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ आणि ‘वर्क-लाइफ बॅलेन्स’ या विषयांवर नेहमीच मोकळेपणे व्यक्त होते. यावेळी दीपिकाने थेट एल अँड टी या कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी केलेल्या वक्तव्यावर तडकाफडकी प्रतिक्रिया दिली आहे, तिने तिच्या सोशल मीडिया स्टोरीद्वारे त्यांनी केलेल्या 'माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावं असं मला वाटतं', या वक्तव्यावर नाराजी दाखवली आहे.
एल अँड टी कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांचे स्पष्टीकरण
लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी म्हटलं आहे की, माझ्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावं... एल अँड टीमध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे... जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले, तर मला जास्त आनंद होईल, कारण मी देखील रविवारी काम करतो.... घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या बायकोला किती वेळ देणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा. त्यांच्या याच वक्तव्यावर आता उद्योगती हर्ष गोयंक, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॅटमिंटन ज्वाला गुट्टानेही प्रतिक्रिया दिली आहे.
‘त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं...’ L&T कंपनीच्या वक्तव्यावर दीपिका भडकली
याचपार्श्वभूमीवर दीपिका पादुकोणने तिची प्रतिक्रिया तिच्या सोशल मीडिया स्टोरीला पोस्ट केली आहे. दरम्यान दीपिका म्हणाली की, एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांना असं विधानं करताना पाहून धक्का बसतो, त्याचसोबत तिने मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं असं हॅशटॅग देत त्यांच्यावर फटकेबाजी केली आहे.
एसएन सुब्रह्मण्यन यांचे वेतन किती?
दरम्यान कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे वार्षिक वेतन कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा 500 पट अधिक आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र सुब्रह्मण्यन यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करत आहे. सुब्रह्मण्यन यांच्या या विधानामुळे पुन्हा वर्क लाईफ बॅलेन्सचा मुद्दा चर्चेत आला आहे.