Delhi Elections
Delhi Elections

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
Published by :
Published on

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दिल्लीत 5 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान, तर 8 फेब्रुवारीला निकाल लागणार असल्याचंही आयोगानं जाहीर केलं आहे. ७० जागांसाठी हे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही- निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ईव्हीएमवर झालेल्या आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही. असं वक्तव्य निवडणूक आयोगानं दिलं आहे.

'आप'साठी सत्ता टिकवण्याचं आव्हान

निवडणुकीचं बिगुल वाजताच दिल्लीतील राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सिसोदिया यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आव्हान दिलं आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या निकालासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत आपची सत्ता स्थापना करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 'आप'साठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कथित मद्य घोटाळ्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. गेल्या १० वर्षाची सत्ता टिकवून ठेवणं आम आदमी पक्षासाठी आव्हान असणार आहे.

'आप'दा ला पळवून लावणार - दिल्ली भाजपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ५ फेब्रुवारी हा परिवर्तनाचा दिवस असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या लोकांना दिल्लीला लुटण्याचं काम केलं, त्या 'आप'देला (आपदा) दिल्लीतून पळवून लावणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपचं डबल इंजिन सरकार स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com