Umar Nabi
Umar Nabi

Umar Nabi : दिल्लीतल्या स्फोटातील आरोपी डॉ. उमर नबीच्या पुलवामा येथील घरावर हातोडा, सुरक्षा दलाकडून 9अन्य दहशतवाद्यांची घर उद्ध्वस्त

नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Umar Nabi) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले.

लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे.या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागली. याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या स्फोटात कार चालवणारा आरोपी डॉ. उमर नबी याच्या जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कोईल या गावी असलेल्या घरावर हातोडा चालविण्यात आला.

उमरचे पालक, भाऊ आणि मेहुणी आदी लोक या दुमजली घरात राहत होते. या सर्वांना बाहेर काढल्यानंतर गुरुवारी रात्री घरावर कारवाई करण्यात आल्याचे पुलवामा येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सुरक्षा दलांनी 9 अन्य दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट

  • दिल्लीतल्या स्फोटातील आरोपी डॉ. उमर नबीच्या पुलवामा येथील घरावर हातोडा

  • सुरक्षा दलाकडून 9अन्य दहशतवाद्यांची घर उद्ध्वस्त

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com