Delhi News: उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या रामलीला मैदानावर हा शपथविधी होणार आहे.
Published by :
Prachi Nate

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. जवळपास 27 ते 28 वर्षानी दिल्लीत भाजप सत्तेत आला आहे. दिल्ली शपथविधी सोहळा कधी होणार याबाबत चर्चा सुरु असताना आता उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा पार पाडला जाणार आहे. हा समारंभ सकाळी 11 वाजता सुरू होईल. तसेच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना दुपारी 12:35 वाजता नियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ घेतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com