Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

"१०० कोटींची लाच घेतली असं म्हणता, मग ते शंभर कोटी गेले कुठे..."; जेलमध्ये जाण्यापूर्वी केजरीवालांचा मोदींना थेट सवाल

"हे २१ दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. मी एकही मिनिट वाय घालवला नाही. देशाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस २४ तास प्रचार केला आहे"
Published by :

Arvind Kejriwal On Narendra Modi : संपूर्ण देशासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कबुली दिली की, माझ्याविरोधात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. ते म्हणतात, १०० कोटींची लाच घेतली. ते शंभर कोटी कुठे गेले? ५०० हून अधिक ठिकाणी तुम्ही छापे टाकले, पण तुम्हाला फुटी कवडी मिळाली नाही. आम्ही पैसै कुठे खर्च केले असतील, लॉकर मध्ये ठेवले असतील, स्विस बँकेतही जर पैसै नसतील, तर पैसै गेले कुठे ? एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता. केजरीवाल यांच्याविरोधात तुमच्याकडे पुरावे नाहीत, मग त्यांना अटक का केली आहे? यावर बोलताना प्रधानमंत्री म्हणाले, केजरीवालांच्या विरोधात पुरावे नाहीत, हे मला माहित आहे. केजरीवाल अनुभवी चोर आहे, असं म्हणत तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

मोदींवर टीका करताना केजरीवाल पुढे म्हणाले, पुरावे नसतानाही मला जेलमध्ये टाकलं. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात सर्वात जास्त बहुमताने आलेलं हे सरकार आहे. एकदा ७० पैकी ६७ जागा, दुसऱ्यावेळी ७० पैकी ६२ जागा, ५५ टक्क्यांहून अधिक मतदान मिळालं आहे. इतक्या बहुमताने आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पुरावे नसतानाही जेलमध्ये टाकलं. हीच तर तानाशाही आहे. मनाला वाटेल त्याला जेलमध्ये टाकणार. त्यांनी देशाला मेसेज दिलाय की, जर आम्ही केजरीवालला खोट्या केसमध्ये अटक केलं, तर तुमची औकात काय आहे, कुणालाही पकडून जेलमध्ये टाकणार, याच तानाशाहीविरोधात मी लढत आहे.

निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी त्यांना मला ही सूट दिली होती. काल २१ दिवस पूर्ण झाले आता इथून मी थेट तिहारमध्ये जाणार आहे. हे २१ दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. मी एकही मिनिट वाय घालवला नाही. देशाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस २४ तास प्रचार केला आहे. फक्त आम आदमी पक्षासाठी प्रचार केला नाही. सर्व पक्षांसाठी प्रचार केला आहे. मुंबईला गेलो, भिवंडीला गेलो.

हरयाणा, उत्तरप्रदेश,पंजाब, जमशेदपूरलाही गेलो. देश वाचवण्यासाठी फिरलो. आम आदमी पक्ष महत्त्वाचा नाही. त्याआधी देश महत्त्वाचा आहे. मला दिल्लीच्या लोकांना सांगायचं आहे की, तुमचा मुलगा पुन्हा जेलमध्ये चालला आहे. भ्रष्टाचार केला आहे, म्हणून मी जेलमध्ये गेलो नाही. तर तानाशाहीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळं मी जेलमध्ये चाललो आहे, असंही केजरीवाल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com