Delhi Blast Update
Delhi Blast UpdateDelhi Blast Update

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटाशी डॉक्टरांचा संबंध, एकाकडे रिसिन विष तर महिला डॉक्टरकडे रायफल, नेमकं काय प्रकरण?

तपासात ही कार स्फोटाच्या काही तास आधी सुनहरी मशिदीजवळ उभी असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली. संध्याकाळी 6:52 वाजता i20 कारमध्ये झालेल्या या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ माजला होता. तपासात ही कार स्फोटाच्या काही तास आधी सुनहरी मशिदीजवळ उभी असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपासादरम्यान चार डॉक्टरांची नावे समोर आली आहेत, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आहे.


डॉ. आदिल अहमद राठर– अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या या डॉक्टरला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल मिळाली असून त्याचे जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी संबंध असल्याचा संशय आहे.

महिला डॉक्टर – फरीदाबादमध्ये पकडलेल्या लखनऊच्या महिला डॉक्टरकडून ‘कॅरोम कॉक’ असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली आहे. ती अल-फलाह विद्यापीठात कार्यरत होती. पोलिस तिची नेटवर्कमधील भूमिका तपासत आहेत.

डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद – गुजरात एटीएसने अटक केलेला हा हैदराबादचा डॉक्टर चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेला आहे. त्याने ‘रिसिन’ हे अत्यंत घातक विष तयार केल्याचे उघड झाले असून दिल्ली, अहमदाबाद आणि लखनऊतील गर्दीच्या ठिकाणांची रेकी केल्याचे समोर आले आहे.

डॉ. मुझमिल शकील– फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात शिक्षक असलेल्या या डॉक्टरकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर ठिकाणी 2,563 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याचे संबंध प्रतिबंधित संघटनांशी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. स्पेशल सेल आणि विविध राज्यांच्या एटीएस पथकांनी मिळून या घटनेचा तपास सुरू ठेवला असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com