Delhi pollution : दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 325 वर पोहोचला! नागरिकांच्या आरोग्याला धोका
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे आणि मृत्यूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. असा इशारा ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025' या अहवालात देण्यात आला आहे. तर, 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झाला.
अशातच दिल्लीतील इंडिया गेटच्या आसपासच्या परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 325 वर पोहोचला आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, जो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) मते अत्यंत खराब श्रेणीत येतो. या अतिशय खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.
दिल्लीचा AQI 350 च्या पुढे गेला आहे, जो गंभीर श्रेणीत येतो, दिवाळीनंतर, दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळी गाठली आहे. अनेक भागात, हवा इतकी प्रदूषित आहे की मॉनिटरिंग स्टेशन्सनी अत्यंत खराब ते धोकादायक पर्यतची पातळी नोंदवली आहे.

