Demolition Drive at Borivali Sanjay Gandhi National Park Amid High Tension
Demolition Drive at Borivali Sanjay Gandhi National Park Amid High Tension

Borivali Sanjay Gandhi National Park : नॅशनल पार्कमध्ये अचानक ॲक्शन मोड! हायकोर्टाचा आदेश आणि रातोरात काय बदल घडवला?

न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाने उद्यानातील अनधिकृत घरे आणि बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईतील बोरिवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज सकाळपासून मोठी कारवाई सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाने उद्यानातील अनधिकृत घरे आणि बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. काल झालेल्या गोंधळानंतर आज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आदिवासी वस्ती असलेल्या भागात वन विभागाची यंत्रणा बुलडोझरसह दाखल झाली असून संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. काल सर्वेक्षणाच्या वेळी काही लोकांनी विरोध करत दगडफेक केली होती, त्यामुळे आज प्रशासन अधिक सतर्क आहे.

घटनास्थळी डीसीपींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण असले तरी पोलिसांच्या संरक्षणात तोडक कारवाई सुरू आहे. जंगलाचे संरक्षण आणि अतिक्रमण रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

थोडक्यात

  1. मुंबईतील बोरिवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज सकाळपासून मोठी कारवाई सुरू आहे.

  2. न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाने उद्यानातील अनधिकृत घरे आणि बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे.

  3. काल झालेल्या गोंधळानंतर आज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  4. ही कारवाई उद्यानातील नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि संरक्षणासाठी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com