ताज्या बातम्या
Pune Land Case : 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा'ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी
पुणे येथील जमिन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पंढरपुरात केली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि सत्तेचा दुरोपयोग केला आहे.
पुणे येथील जमिन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पंढरपुरात केली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि सत्तेचा दुरोपयोग केला आहे. त्यामुळे अजित पवार देखील या घोटाळ्यात त्यांचा सहभाग आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या शिवाय निःपक्ष चौकशी होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही हाके यांनी दिला आहे.
