Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पंतप्रधान मोदींशी भेट; ४० मिनिटे सविस्तर चर्चा

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पंतप्रधान मोदींशी भेट; ४० मिनिटे सविस्तर चर्चा

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत राज्याच्या विकासासंबंधी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत राज्याच्या विकासासंबंधी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र-राज्य समन्वय, महाराष्ट्रातील प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक गुंतवणूक वाढ, तसेच शेती आणि सहकार क्षेत्रातील प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी सकारात्मक संवाद झाल्याचे समजते.

याशिवाय आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही या भेटीकडे पाहिले जात आहे. उपस्थित नेत्यांच्या सहभागामुळे या चर्चेचे राजकीय संकेत काय असतील, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या भेटीबाबत अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले, तरी लवकरच बैठकीतील चर्चेचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. राज्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात असून, पुढील काही दिवसांत याचे परिणाम स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com