Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"सोयाबीन, कापसाचे भाव पडले, पण आमच्या सरकारने..."; जळगावात देवेंद्र फडणवीस कडाडले

आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु झालं. या युद्धात जगात शेतमालाचे भाव पडले. आपल्याकडे सोयबीन, कापसाचे भाव पडले. त्यानंतर आमच्या सरकारने भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. ४ हजार कोटी रपये कापसाच्या आणि सोयाबिनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. ते रक्षा खडसे आमि स्मिता वाघ यांच्या प्रचारसभेत जळगावमध्ये बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, मोदींनी गेल्या दहा वर्षात २० कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे, त्यांना पक्क घर दिलं. ५० कोटी लोकांच्या घरात गॅस नव्हता, त्यांना गॅस दिला. ६० कोटी लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी दिलं. महाराष्ट्रातही घरोघरी पाणी पोचलं. ५५ कोटी लोकांना मोदींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत मोफत उपचार दिला. ६० कोटी तरुणांना मुद्राच्या अंतर्गत कर्ज दिलं. या देशात ८० लाख बचत गट तयार झाले. त्यांना ८ लाख कोटी रुपये त्यांना दिले. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला.

जगात आमच्या विरोधकांना वाटतंय, ग्रामपंचायत निवडणूक चालली आहे. त्यांना कल्पनाच नाहीय. त्यांची विचार करण्याची स्थिती नाही. ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही. देशाचा नेता निवडण्यासाठी ही निवडणूक आहे. पुढचे पाच वर्ष देश कोणाच्या हातात द्यायचा, देश कोणाच्या हातात सुरक्षित असेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. मोदी आपल्या युतीचं पॉवरफुल इंजिन आहेत. त्यामध्ये वेगवेगळे डब्बे लागले आहेत. या डब्ब्यांमध्ये दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, ओबीसी, या सर्वांना बसण्याची जागा आहे.

सर्वांना त्यात बसवून सबका साथ, सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जात आहे. तिकडे प्रत्येकजण स्वत:ला इंजिन समजतो. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, लालूप्रसाद म्हणतात मी इंजिन आहे. तिथे इंजिनच आहे. तिथे डब्बा नाहीय. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का, इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीनाच जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे.

यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या कुटुंबाला जागा आहे. सामान्य माणसाला जागा नाही. यांच्यासाठी यांचं परिवारच दुनिया आहे. पण मोदींसाठी संपूर्ण भारत त्यांचा परिवार आहे. यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे, राहुल गांधी दिल्लीकडे इंजिन वळवतात. पवार साहेब बारामतीकडे इंजिन ओढतात. उद्धव ठाकरे मुंबईकडे इंजिन वळवतात. स्टॅलिन दक्षिणेकडे वळवतात. यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही.

यांचं इंजिन ठप्प पडलेलं इंजिन आहे. जळगाव जिल्ह्याची बोगी मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवरून अत्यंत वेगाने निघेल. म्हणून ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे. विरोधकांच्या भाषणात विकासाचा, गरिबांच्या कल्याणाचा, शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मुद्दा नाही. सामान्य माणसाच्या कल्याणाचा मुद्दा नाही. त्यांच्याकडे फक्त शिवराळ भाषा आहे. नरेंद्र मोदींनी २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. हा जगातला विक्रम आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com