Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा अटकेत
Admin

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा अटकेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

याच पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com