Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Vs Uddhav ThackerayTeam Lokshahi

"मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी..."; देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर तुफान फटकेबाजी

Published by :
Sudhir Kakde

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने मागच्या कामात केलेल्या कामांवर टीका केली आहे. 'मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मै पहले भी कई तुफानो का रुख मोड चुका हूँ' असं म्हणत विरोधकांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या सरकारमध्ये अघोषित आणीबाणी होती, सर्व प्रकारची कामं बंद होती, पत्रकारांना, सामान्य माणसांना किंवा अन्य कुणीही सरकारविरोधात बोललं की त्यांच्यावर कारवाई केली जात होती. त्यामुळे हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती असं म्हणत फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित केलं.

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray
"सत्य न पडताळता माध्यम कांगारु कोर्ट चालवतायेत, हे लोकशाहीसाठी धोकादायक"

2019 विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही युतीसाठी मोठा त्याग केला. मात्र त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलेलं होतं. ज्याक्षणी त्यांच्या लक्षात आलं होतं की, नंबर गेम जमणार आहे, त्यानंतर त्यांनी चर्चा केली नाही. मी फोन करत होतो, मात्र ते फोेन घेत नव्हते असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच या सर्व गोष्टींना न जुमानता सरकारमधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक असून, आपल्या सोहत आलेली हीच खरी शिवसेना आहे असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातील सरकार आज अस्तित्वात आलं. त्यामुळे आपलं राज्य आता खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकेल. त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये स्थगितीशिवाय काहीच नव्हतं. आपण निवडून आल्यावर जलयुक्त शिवार सुरु केलं, बुलेट ट्रेनच्या अडचणी कमी केल्या, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या यांसह अनेक कामांचा पाढा उपमुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की, माझ्या नेत्यांनी मला सांगितलं असतं घरी जा तुझं काम झालंय, तर मी घरी गेलो असतो. मात्र त्यांनी मला सांगितलं की, सरकारच्या बाहेर राहून सरकारमध्ये राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला सांगितलं आणि मी ते स्विकारलं. तसंच फडणवीस पुढे असंही म्हणाले की, आपले सगळ्यांचे नेते हे एकनाथ शिंदे हेच असून, त्यांच्या नेतृत्वात हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करेल आणि त्यापुढेही हे सरकार निवडून येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com