Supriya Sule On Devendra Fadnavis
Supriya Sule On Devendra Fadnavis

"...देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत", इंदापूरच्या भाषणावर सुप्रिया सुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरच्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती.
Published by :

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरच्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचे कलम ३७० हटवण्यासंदर्भात विधेयक मांडलं होतं. या विधेयकाला सुप्रिया सुळे यांनी विरोध केला होता, असं फडणवीस म्हणाले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलंय, लोकशाही आहे. कुणी काय भाषण करायचं हा अंतर्गत प्रश्न आहे. माझं संसदेतील भाषण देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत, असं मला वाटतंय.

हेलिकॉप्टरने माणसं आणू आणि संजय मंडलिक यांना विजयी करू, असं विधान राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी नुकतच केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, त्यांचे विधान म्हणजे, मोठी माणसं, मोठ्या गोष्टी..मोठ्या लोकांनाच हेलिकॉप्टरचं सूचतं. ते धनवान आहेत. मोठे लोक आहेत. एखाद्या पक्षाला मतदारांच्या फेऱ्या मारण्यासाठी हेलिकॉप्टर परवडत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चौकशी करावी. या नेत्याची प्राप्तिकर विभाग, ईडी आणि सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी मी करते. इतके पैसे या लोकांकडे आले कुठून? हे चिंताजनक आहे. हसन मुश्रीफ यांची चौकशी झाली पाहिजे. राज्यात सुडाचं राजकरण सुरू आहे, ही दुर्देवी बाब आहे. घर आणि पक्ष उध्वस्त करण्यासाठी राज्यात राजकारण केलं जातं आहे. विकास होत नाही, तर गलिच्छ राजकारण सुरु आहे.

रोहित पवारांच्या खेकडा प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नक्की काय झालं आहे? याबाबत जरूर माहिती घेईन. पवार कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र होत आहे. चंद्रकांतदादा स्वतःच बारामतीला येऊन बोलले, आम्हाला या निवडणुकीत शरद पवारांना संपवायचं आहे. शरद पवारांना संपवण्यासाठी हे काहीही करु शकतात. कुठलीही गलिच्छ पातळी गाठू शकतात. कृतीतून आणि पोटातलं ओठात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com