सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत - चंद्रकांत खैरे

सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत - चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार असून सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार असून सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत. शिंदेचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार होते. नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच त्यांनी सांगितले की, त्यांची ठाण्यात ताकद असली तरी मग आमचे ठाण्याचे खासदार का गेले. शेवटी सगळेच, जनता पाहत असते की कोणी काय खोके घेतले आणि कोणी काय केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. 40 आमदार तर पडणारच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण पडणार. जेथे छगन भुजबळ, नारायण राणे सुद्धा पडले होते तिथे हे काय?देवेंद्र फडणवीस हुशार माणूस काँग्रेसचे 22 आमदार भाजपा फोडणार अशा शब्दात खैरे यांनी जोरदार निशाणा लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com