Devendra Fadnavis on Rahul Gandhi : "रोज खोट बोललं की लोकांना खरं वाटत...", फडणवीसांचा राहुल गांधीना टोला

फडणवीसांचा टोला: राहुल गांधींनी खोटं बोलून लोकांना खरं वाटतं असं वाटतं
Published by :
Riddhi Vanne

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींनी लेख लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढले नाहीत तेवढे मतदार निवडणुकीच्या काळात वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्या आरोपावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, "रोज खोट बोललं की लोकांना खरं वाटत असं राहुल गांधीना वाटते. एकच गोष्टी सतत पाहतात. हा आरोप त्यापूर्वी त्यांनी लावला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सर्वांना माहिती आहे, पण रोज खोटं बोलायचं ही सवय राहुल गांधींना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत. "

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com